Breaking News

विकासकामांचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

आमदार प्रशांत ठाकूर यांचा यशस्वी पाठपुरावा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सिडकोच्या माध्यमातून नवीन पनवेल सेक्टर 1 ते 12मधील रस्ते, फुटपाथ व गटारांच्या कामांचे भूमिपूजन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते सोमवारी (दि. 9) उत्साहात करण्यात आले.
पनवेल महापालिका झाली तरी नवीन पनवेल परिसर अद्याप महापालिकेकडे पूर्णपणे हस्तांतरित झाला नसल्याने तेथील कामे अद्याप सिडकोमार्फत केली जातात. त्यामुळे तेथील नगरसेवकांना आपल्या प्रभागात नगरसेवक निधी वापरता येत नाही. त्यामुळे सेक्टर 1 ते 12मधील रस्त्याची कामे अनेक दिवस रखडली होती. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने सिडकोने येथील रस्ते, फुटपाथ व गटारांची कामे मंजूर केली. या कामांचे भूमिपूजन सोमवारी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी प्रभाग ‘ब’ सभापती संजय भोपी, नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर, नगरसेवक मनोहर म्हात्रे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, साऊथ सेल रायगड जिल्हाध्यक्ष भास्कर आणि  नागरिक उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर ‌‘रयत‌’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणजे विकासाचे कणखर नेतृत्व ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पनवेल ः रामप्रहर …

Leave a Reply