Breaking News

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्यास सक्तमजुरी

अलिबाग : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणार्‍या नराधमास अलिबाग सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. विनोद बुद्धू सहाणी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

ही घटना पनवेल तालुक्यातील पेंधरगाव येथे 1 मार्च 2018 रोजी घडली होती. पिडीत मुलगी आरोपीच्या शेजारी राहत होती. या सहा वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून विनोद सहाणी याने आपल्या खोलीत बोलावले आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी मुलीच्या आईने तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी तपास करून या प्रकरणी अलिबाग सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश- 2  एम. व्ही. मोहिते यांच्यासमोर झाली. शासकीय अभिव्योक्ता म्हणून अश्विनी बांदिवडेकर पाटील यांनी काम पाहिले. सुनावणी दरम्यान एकूण सहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात पिडीत मुलगी, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार, पोलीस निरीक्षक यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी विनोद सहाणी यास भादंवी कलम 376 (2) (आय) आणि पॉस्को कायदा कलम 4, 6 अन्वये दोषी ठरवले आणि दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि दंडही ठोठावला.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply