पनवेल ः वार्ताहर
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रायगडच्या इतिहासात प्रथमच मुलींची अंडर 19खाली निवड करण्यात आली. ही निवड चाचणी खारघर इनामपुरी येथे झाली.
निवड चाचणीसाठी रायगड जिल्ह्यातून एकूण 34 मुली आल्या होत्या. त्यातून चार मुलींची निवड करून त्यांना महाराष्ट्र निवड चाचणीसाठी पाठवण्यात आले. या वेळी मनीषा अडबळ आणि नीलम पाटील ह्या सिलेक्टर उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, सरचिटणीस बहुतुले, स्पर्धा कमिटीचे चेअरमन किरीट पाटील, निवड कमिटीचे चेअरमन प्रीतम कैया, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पावसकर, सुयोग चौधरी, संदीप पाटील, सुहास हिरवे, सागर सावंत आदी उपस्थित होते.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …