Tuesday , March 21 2023
Breaking News

शांतीवनमध्ये निवासी शिबिरास प्रतिसाद

नेरे : रामप्रहर वृत्त गांधी स्मारक निधी मुंबई पुरस्कृत निवासी शिबिर शांतीवन येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन कुष्ठरोग निवारण समिती शांतीवनचे प्रशासकीय अधिकारी उरणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिबिर मार्गदर्शक शुभदा शर्मा,  शांतीवन समन्वयक संजय गुळुंबकर, प्रशिक्षक परमेश्वर नवले, शिवाजी बार्शी आदी  उपस्थित होते. संजय गुळुंबकर व  शिवाजी बार्शी यांनी स्वच्छतेविषयी माहिती दिली. प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. यानंतर सर्वांनी शांतीवन परिसरातील आदिवासी आश्रमशाळेत जाऊन आदिवासी आश्रमशाळा कशी चालते याची पाहणी केली. शेवटी टावरवाडी आदिवासी गावात प्रत्यक्ष जाऊन स्वच्छता, ओला-सुका कचरा, शौचालय, सफाई आदी गोष्टींवर भर देऊन गावात परिभ्रमण करीत काम केले. या वेळी टावरवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनीही सहभाग घेतला होता. जया खैरनार मॅडम व दिलीप गुरुजी यांनी मोलाचे सहकार्य केले. सर्व शिबिराचे नियोजन मेहता यांच्या मार्गदर्शनानुसार झाले.

Check Also

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप …

Leave a Reply