Breaking News

पनवेल मनपाच्या सफाई कर्मचार्‍यांचा कोरोना योद्धा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना वैश्विक महामारीच्या काळात पनवेल महापालिकेत कार्यरत असलेल्या सफाई कामगारांनी आपले सेवाकार्य अविरतपणे सुरू ठेवले होते. त्याबद्दल या सफाई कामगारांना शनिवारी (दि. 24) कोरोना योद्धा प्रमाणपत्र व एका वेळचे भोजन देऊन खांदा कॉलनी येथे सन्मानित करण्यात आले. सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास वंदे मातरम् जनरल कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष मोतीलाल कोळी, भाजप अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सदस्य साबीर शेख, प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना महापालिका अध्यक्ष रोहित कोळी, उपाध्यक्ष आभा जोशी, सरचिटणीस अनिकेत लाखे, खजिनदार सिद्धेश खानावकर, रविना आर्य, सचिव हर्षल बहाडकर, इशांत नझरे, सदस्य हर्षल सावंत, राहुल वाघ, आकाश काटकर, प्रतिक बडेकर, कुशल कोळी, प्रसन्न सकपाळ, सौरभ टकले, संगीता आदी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply