Breaking News

अमेरिका टू निगराणी कक्ष व्हाया नेरळ

कर्जत : बातमीदार

अमेरिकेत नोकरी करीत तरुण गुरुवारी

(दि. 19) नेरळ येथे आपल्या घरी परत आल्याची माहिती मिळताच शुक्रवारी दुपारी सर्व प्रशासकीय यंत्रणा त्याच्या घरी पोहोचली. तो कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेला रुग्ण नाही, परंतु खबरदारी म्हणून त्याला जीवन विद्या मिशन येथील निगराणी कक्षात पुढील 14 दिवस ठेवण्यासाठी नेण्यात आले आहे.

कर्जत तालुक्यात आतापर्यंत 15 जण निगराणी कक्षात आहेत. आरोग्य विभागाने तालुक्यात संक्रमण केंद्र सुरू केली असून वैजनाथ मालेवाडी येथील जीवन विद्या मिशनमध्ये मुख्य निगराणी कक्ष बनाविण्यात आला आहे. दुबई येथून पर्यटन करून आलेल्या कर्जत तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील 15 जणांवर मागील चार दिवसांपासून निगराणी कक्षात उपचार सुरू आहेत.

अमेरिकेतून आपल्या घरी नेरळ येथे आलेल्या त्या तरूणाला खबरदारी म्हणून वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली निगराणी कक्षात ठेवण्यात येत आहे. कोणीही घाबरून जाऊ नये, तसेच चुकीची माहिती वा अफवा

पसरवू नये.

-विक्रम देशमुख, तहसिलदार, कर्जत

त्या तरुणाच्या घरातील कोणालाही खोकला, ताप यापैकी काहीही झालेले नाही, मात्र तरीदेखील पुढील 14 दिवस प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक त्या तरुणाच्या घरातील सर्वांची तपासणी करणार आहे. तो तरुण कोरोनाचा रुग्ण नाही, हे समजून घेऊन नेरळमधील नागरिकांनी घाबरू नये आणि अफवा पसरवू नयेत.

-डॉ आशुतोष पेठे,

वैद्यकीय अधिकारी, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र

पेण आरटीओचे शिबिर स्थगित

पेण : प्रतिनिधी

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ अनुज्ञप्तीचे कामकाज 31 मार्चपर्यंत बंद असेल. ज्या अर्जदारांनी 31 मार्चपर्यंत अपॉइंटमेंट्स घेतल्या असतील, त्यांच्या अपॉइंटमेंट्स पुढील महिन्यात रिशेड्यूल करण्यात आल्या आहेत. 31 मार्चपर्यंत कार्यालयामध्ये फक्त अनुज्ञप्तीचे नूतनीकरण, वाहनांच्या

पुनर्नोंदणी, योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण, परवानासंबंधीची कामेच करण्यात यावीत. वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा नोंद इत्यादी इतर कामे पुढे ढकलण्यात यावी. नवीन नोंदणीचे सर्व कामे सुरू राहतील. 19 मार्चला मुरूड कॅम्पच्या अपॉइंटमेंट्स 16 एप्रिलला रिशेड्यूल केल्यात. 20 मार्चला अलिबाग कॅम्पच्या अपॉइंटमेंट्स 17 एप्रिलला रिशेड्यूल केल्या आहेत. कोरोनाची तीव्रता वाढल्यास परिवहन आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे पुढील निर्णय घेऊन जनतेला अवगत केले जाईल.

खोपोलीत सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी; खासगी समारंभांवरही करडी नजर

खोपोली : प्रतिनिधी

कोरोनासंदर्भात राज्य सरकार, आरोग्य विभाग व जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार खोपोली नगरपालिकेकडून धडक मोहीम सुरू करण्यात

आली आहे.

यासंदर्भात बुधवारी नगराध्यक्षा सुमन औसरमल व मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी विशेष आदेश व सूचना जारी केल्या आहेत. यानुसार शहरात सभा, समारंभ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक स्वरूपाचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम, महोत्सव, आंदोलने पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बंद करण्यात आली आहेत. तसेच यापूर्वी अशा कोणत्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली असल्यास ती परवानगीही रद्द करण्यात आली आहे. खासगी समारंभ ज्यात लग्न, वाढदिवस अगर अन्य कोणतेही कार्यक्रम ज्यात 50हून अधिक लोक एकत्र येण्याची शक्यता असेल असे कार्यक्रम, समारंभही स्थगित करावेत किंवा पुढे ढकलण्याची विनंती नगरपालिकेकडून करण्यात आली आहे.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply