Breaking News

घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप

उरण : रामप्रहर वृत्त

कोरोना व्हायरसचा प्रभाव टाळण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून जनजागृतीसाठी बॅनर लावण्यात आले आहेत. जगात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. त्यामध्ये बळी जाणार्‍या रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. घारापुरी बेट हे लेण्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे त्या पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. त्यामुळे खबरदारी म्हणून कोरोनाचा हा वाढता प्रसार रोखण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी (दि. 21) ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच गावात अनेक ठिकाणी जनजागृतीसाठी बॅनर लावण्यात आले आहेत. या वेळी उपसरपंच सचिन म्हात्रे, सदस्य मंगेश आवटे, भरत पाटील, सदस्या मीना भोईर, ज्योती कोळी, शुभांगी मायने, ग्रामसेवक पवित्र कडु तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply