Breaking News

भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले रक्तदान

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना विषाणूच्या साथीमुळे रक्तदान शिबिराचे आयोजन करणे शक्य नसल्याने कॅन्सर पीडित रुग्णांना लागणार्‍या रक्तपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगडच्या वतीने व धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. 23) युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, खारघर व तळोजा युवा मोर्चाचे अध्यक्ष विनोद घरत, तसेच प्रमोद पाटील, रितेश रंगुराज, संतोष रेवणे, राम जाधव, लक्ष्मण भतोसे, सुनील साळुंके, अभिषेक पवार यांनी खारघरमधील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply