Breaking News

निरोगी आरोग्याची गुढी उभारण्याचा संकल्प

पनवेल : रामप्रहर वृत्त
गुढीपाडव्याचा सण बुधवारी (दि. 24) पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा निरोगी आरोग्याची गुढी उभारण्याचा संकल्प नागरिकांनी केल्याचे दिसून आले.
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षारंभ होतो. भारतीय संस्कृतीत चैत्र महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. केवळ धार्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिकच नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही हा मास उत्साहवर्धक असतो, परंतु या वर्षी संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे सावट आहे. त्यामुळे आपला देशही सध्या लॉकडाऊन आहे. या पार्श्वभूमीवर पाडव्यानिमित्त निघणार्‍या शोभायात्राही रद्द करण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी विधीवत पूजा-अर्चा करून व गुढी उभारून साधेपणाने गुढीपाडवा साजरा केला. सोशल मीडियावरही घरी राहून आरोग्याची काळजी घेत हा सण साजरा करण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply