Breaking News

निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

खोपोली ः प्रतिनिधी : कोरोनाविरोधात लढा तीव्र करण्यासाठी देशात लॉकडाऊन व राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यादरम्यान ज्यांचे हातावर पोट आहे व जी निराधार कुटुंबे आहेत त्या सर्वांना खोपोली पोलिसांनी पुढील 15 ते 20 दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करून मोठा दिलासा दिला आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने खोपोली पोलीस स्टेशन हद्दीतील अशा सर्व घटकांना शुक्रवारी (दि. 27) अन्यधान्याचे वाटप करण्यात आले.

उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, खोपोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर व अन्य सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांनी यासाठी पुढाकार घेतला. या वेळी उपअधीक्षक डॉ.  रणजित पाटील, वरिष्ठ निरीक्षक धनाजी क्षीरसागर, खोपोली पोलीस स्टेशनचे अन्य अधिकारी-कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी हे साहित्य वाटप केले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply