Breaking News

टपाल, सफाई कामगारांची तपासणी करण्याची मागणी

कळंबोली : प्रतिनिधी

नवी मुंबई विभागात टपाल कर्मचारी (पोस्टमन) व महानगरपालिकेत हजारो सफाई कामगार आहेत त्यांचा थेट जनतेशी संबंध येतो. त्यांच्यापासून कोरोनाची लागण रोखण्यासाठी, कोरोनाला प्रतिबंध म्हणून त्यांची आरोग्य विभागामार्फत  तातडीने कोरोना तपासणी करण्यात यावी, अशी मागणी विविध टपाल संघटनांकडून केली जात आहे. भारत सरकारच्या टपाल विभागाची 134 कार्यालये आहेत. त्या कार्यालयांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. तसेच पनवेल, नवी मुंबई महानगरपालिकेत हजारोंच्या संख्येने सफाई कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचार्‍यांचे जनतेशी प्रत्यक्ष सबंध येतो. कोरोनाच्या महामारीत या कर्मचार्‍यांना कोणत्याही सोयी सुविधा पुरविल्या जात नाहीत. जीव धोक्यात घालून व जीव मुठीत घेऊन ते जनतेची सेवा करीत आहेत. या कर्मचार्‍यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांच्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होण्याची भिती नागरिकांपासून परिवाराला लागली आहे. अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांना सक्तीने कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पण त्यांना कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नाहीत, त्याबद्दल अधिकारी एकही शब्दही काढण्यास तयार नाहीत. प्रशासनाचा कर्मचार्‍यांच्या जीवाशी खेळ खेळण्याच्या निर्णयाचा संघटनांनी निषेध केला आहे. तसेच जीवावर खेळून जनतेची सेवा करणार्‍या टपाल कर्मचारी व महानगरपालिका सफाई कर्मचार्‍यांची तातडीने चाचणी करण्याची मागणी टपाल संघटनांनी केली आहे.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply