मुंबई : प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थीवर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या गरीब, गरजूंची उपासमार होऊ नये यासाठी राज्य शासनाने उपाययोजना करावी, या मागणीला यामुळे यश आले आहे.
सवलतीचा दर जूनपर्यंत लागू राहणार असून, सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत भोजन उपलब्ध असणार आहे.