खोपोली ः प्रतिनिधी
कोरोनाचे महाभयानक संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. खोपोलीतही संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. खोपोली पालिकेच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (दि. 7) पालिकेच्या प्रवेशद्वारावर नगरपालिका प्रशासनाकडून कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष विनिता कांबळे-औटी, मुख्याधिकारी गणेश शेटे, खोपोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांसह वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या निर्जंतुकीकरण कक्षामधूनच कोणीही नागरिक प्रवेश करून मगच पुढे नगरपालिका कार्यालयात जाणार अशी व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच निर्जंतुकीकरणाचे महत्त्व व त्याबाबतच्या सूचना ठळकपणे लावण्यात आल्या आहेत.