Breaking News

उरण नगर परिषदेच्या वतीने आज सायकल रॅली

उरण : वाराहर

उरण नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे रायगड-अलिबाग सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीला शुक्रवारी (दि. 29) सकाळी 10 वाजता उरण नगर परिषद कार्यालयातून सुरुवात होईल.  पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी नागरिकांना, विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ पद्धतीने एक सायकल देण्यात येईल, तसेच सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, नगरसेवक कौशिक शाह, आरोग्य सभापती यास्मिन गॅस, मुख्याधिकारी संतोष माळी, महिला व बालविकास सभापती स्नेहल कासारे, सर्व नगरसेवक, कर्मचारी आदींचे सहकार्य लाभणार आहे.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply