Breaking News

खांदेश्वर ओनर्स अपार्टमेन्टमध्येे निर्जंतुकीकरण; माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांचा पुढाकार

कळंबोली : प्रतिनिधी

खांदा कॉलनी सेक्टर 1मध्ये मंगळवारी (दि. 7) देहराडूनवरून आलेल्या एका तरूणाला पनवेल उपजिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी दाखल करण्यात आले, असून ही सोसायटी किटकनाशक फवारणी करून निर्जंतुक करण्यात आली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी सुटकेचा श्वास सोडत भाजपचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांचे आभार मानले आहेत.

खांदा कॉलनी सेक्टर 01, खांदेश्वर ओनर्स अपार्टमेंट येथील दिल्ली वरून आलेला हा मुस्लिम तरूण आपल्या आई, वडील, समवेत राहत आहे. तो काही कामानिमित्त देहराडून येथे गेला होता. काल तो आला असता सोसायटीचे पदाधिकारी व माजी नगराध्यक्ष गणेश पाटील यांनी त्यांनी कोरोना तपासणी करण्याची विनंती केली पण त्यांचे वडील वकील असल्याने त्यांनी सुरुवातीला तपसणी करण्यास विरोध दर्शविला, परंतु गणेश पाटील यांनी पोलिसांच्या मदतीने त्याला पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची तपासणी चालू असून अद्याप त्याचा रिपोर्ट आला नाही. त्यानंतर गणेश पाटील व सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी ही सोसायटी निर्जंतुक करण्याची मागणी केली होती, त्याप्रमाणे पनवेल महानगरपालिकेने बुधवारी (दि. 8) तातडीने ही संपुर्ण सोसायटीत किटकनाशक फरवाणी करण्यात आली. यावेळी  पनवेल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, यशवंत थोरात, अस्विनी जोगदंड, महावीर लोखंडे, पांड्या चव्हाण, बाबर, सोनावणे, उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply