Breaking News

चिर्ले परिसरातील आदिवासी, गरजू कुटुंबांना भाजपकडून जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त    

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पक्ष चिर्ले, सबका साथ सबका विकास मंडळ चिर्ले यांच्या आयोजनाने दीपक पाटील यांच्या स्वखर्चाने आदिवासी व गरजू अशा कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये चिर्ले गावातील 100 निराधार महिला, गावठाण गावातील 50 निराधार महिला तर जांभूळपाडा गावातील 35 निराधार महिला व आदिवासीवाडीतील 59 आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी दीपक पाटील यांच्यासह कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत, भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ घरत, गाव अध्यक्ष तथा तालुका पदाधिकारी संतोष मढवी, उरण तालुका चिटणीस राजन घरत, चिर्ले उपाध्यक्ष  मधुकर मढवी, चिटणीस नामदेव रसाळ, उपाध्यक्ष तुकाराम मढवी, उपाध्यक्ष अनंत ठाकूर, राजेश पाटील, संतोष भगत, अनंत ठाकूर, मोतीराम मढवी, पंढरीनाथ ठाकूर, समीर घरत, चेतन ठाकूर, जांभूळपाडा भाजप अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष शशिकांत पाटील, विनोद पाटील, द्वारकानाथ पाटील, विनोद मढवी, संजय घरत, चंदन भगत, अक्षय ठाकूर, दिव्यांक घरत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply