कळंबोली : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने गर्दी टाळताना पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका कुसूम पाटील व माजी नगराध्यक्ष गणेश पाटील यांनी आपल्या कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून विनम्र अभिवादन करून जयंती साजरी केली.
देशावर कोरोनाचे मोठे संकट आहे. कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही. कोरोना या महामारीविरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. ती देशाची कोरोनाविरोधातील लढाई गंभीर वळणावर आली आहे तेव्हा 3 मेपर्यंतचा लॉकडाऊन देशाच्या द़ृष्टीने महत्त्वाचा आहे, याचा विचार करून पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका कुसूम पाटील व माजी नगराध्यक्ष गणेश पाटील यांनी आपल्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीनिमित्त, खांदा कॉलनी विभागातील सफाई कामगारांना सॅनिटरी बॉटल तसेच चहा, पाणी बॉटल व बिस्कीटे देवी आंबा माता चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वाटप करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रिपब्लिकन पक्षाचे नेते यांनी केलेल्या आवाहनाला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरातून बाहेर न पडता घरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली.