नवी मुंबई : बातमीदार – महावितरण नेरुळ उपविभाग अंतर्गत येणार्या जुईनगर येथे मच्छीमार्केट सेक्टर 23 शेजारी असलेले 630 केव्हीए क्षमतेचे रोहित्र दि. 14 एप्रिल रोजी दुपारी वाजताच्या सुमारास नादुरुस्त झाला होता. त्यामुळे सेक्टर 23 जुईनगर ह्या परिसरात राहणारे सुमारे 300 ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. खंडित झालेला विद्युतपुरवठा शेजारी असलेल्या रोहित्रावर स्थानांतरित करून त्वरित सुरळीत करण्यात आला. मात्र रात्रीच्या वेळेला रोहित्रावर लोड वाढुन परत ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून नादुरुस्त झालेला रोहित्र बदली करण्याचे काम युद्धपातळीवर घेण्यात आले.
सध्याचा परिस्तिथीत जेव्हा देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्याकरीता संचार बंदी लागू आहे, त्याकाळात माथाडी कामगारविना रोहित्र बदली करणे खूप अवघड लक्ष्य होते. पण परिस्थिती लक्षात ठेवून नेरुळ विभागीय कार्यालयानी नेमलेल्या ठेकेदार यांच्या साहाय्याने हायड्रा व टेम्पो याची व्यवस्था 5.00 वाजता करण्यात आली व नेरुळ विभागीय कार्यालयातील रोहित्र उपलब्ध असल्याकारणाने नेरुळ शाखा क्रमांक 3चे कर्मचारी व अभियंता यांच्या मदतीने रोहित्र बदली करण्याचा काम हाती घेण्यात आला.
काम सोपं नसला तरीही नेरुळ उपविभाग येथील 8 कर्मचारी व 4 लेबर यांचा मदतीने नादुरुस्त झालेला 2.8 टन वजनाचा रोहित्र स-स्टेशन मधून ाहेर खेचून तो विभागीय कार्यालय सी-वूड येथे जमा करण्यात आला व नवीन रोहित्र परत स-स्टेशन मध्ये शारीरिक व बौध्दिक बळ वापरून परत स्थापित करण्यात आला. हे काम अवघ्या 6 तासात रात्री 11.00 वाजता पूर्ण करण्यात आले.
हे काम नेरुळ विभागाचे कार्यकारी अभियंता सिंहाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण धनाईत, सहायक अभियंता अमोल धोंगडे, सहाय्यक अभियंता जितेंद्र पाटील, प्रधान तंत्रज्ञ मधुकर कोळी, चेतन म्हात्रे, वरिष्ठ तंत्रज्ञ शंकर घाडी, सुशील दळवी, संदीप घाडगे, तंत्रज्ञ अजय म्हात्रे, अभिजीत खुस्पे, बाह्यस्त्रोत कर्मचारी आनंद शेवाळे व लेबर रमेश, अंजाप्पा, शिनू, थकलाप्पा यांचा सहभागाने पार पाडण्यात आला.