Breaking News

गुरे चोरणारी टोळी गजाआड; नेरळ पोलिसांची कामगिरी

कर्जत : बातमीदार

बदलापूर येथे कात्रप नाका येथे असलेली पोलीस संचारबंदीचे बॅरिकेट तोडून निघालेली तवेरा गाडी पुढे शेलू आणि नेरळ येथील बॅरिकेट्स उडवून सुसाट वेगाने कर्जतकडे जात होती. त्या वेगाने जाणार्‍या गाडीचा पाठलाग नेरळ पोलिसांच्या दोन वाहने तसेच बदलापूर येथील स्थानिक तरुण यांनी केलेला पाठलाग कामी आला आणि त्या गाडीला वेगाने जात असताना अपघात घडला. दरम्यान, फिल्मी स्टाईलने सुरू असलेला पाठलाग हा पहाटे तीन वाजता संपला आणि रात्रभर धावपळ करणारे पोलीस आणि बदलापूर येथील तरुण यांचे

श्रम कामी आले.

या सराईत टोळीला पकडण्यासाठी पोलीस अधिकारी अविनाश पाटील, तात्या सावंजी यांच्या सोबत पोलीस कर्मचारी समीर भोईर, निलेश वाणी, सुरेश बोडके, प्रशांत बेले, शेखर मोरे, उद्धव पाटील, अविनाश वाघमारे, यांनी बदलापूर येथील तरुणांसह पाठलाग केला होता. पोलिसांनी अपघात झालेली गाडी ताब्यात घेतली असून त्या गाडी मध्ये नायलॉनच्या दोरीचे पाच सेट, गुंगीचे औषधची बाटली, तसेच पाच इंजेक्शन तसेच तीन सिरीन आणि दोन ब्रेडची पाकिटे असे साहित्य जप्त केले असून गुरे चोरण्यासाठी आलेली टोळी नेरळ पोलिसांनी दाखवलेल्या धाडसामुळे पकडण्यात

यश आले आहे.

कर्जत तालुका आणि परिसरातून उन्हाळ्यात गुरे चोरणारी टोळी सक्रिय असते आणि ती टोळी हीच असून पकडण्यात आलेल्या तरुणांकडून जी गाडी अपघातग्रस्त झाली ती गाडी गुजरात पासिंगचा नंबर लावून फिरत असून तो नंबर बोगस आहे की खरा? याचा शोध पोलीस घेत आहेत.

गुरे चोरण्यासाठी आलेल्या आणि पोलिसांच्या बॅरिकेट तोडून पुढे जाणारी तवेरा गाडी मधील सर्व चार तरुणांवर भा. दं. वि. कलम 379, 511, 279, 337, 188, 264, 270, 34 तसेच मोटार वाहन कायदा अधिनियम 1986 चे कलम 184,24(2),177 खाली गुन्हा नोंद करण्यात आला असून कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांनी या गुरे चोरणार्‍या टोळीला अटक केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक केले आहे.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply