Breaking News

प्रचाराची बाइक रॅली

प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; पनवेल, कामोठे, खांदा कॉलनीत प्रचार

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या प्रचारार्थ पनवेल, खांदा कॉलनी आणि कामोठे परिसरात मंगळवारी बाइक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. पनवेल विधानसभा मतदारसंघातील पनवेल शहर, कामोठे आणि खांदा कॉलनी येथे भाजप, शिवसेना आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, आरपीआय कोकण प्रांताध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती अध्यक्ष संजय भोपी, गोपीनाथ भगत, तेजस कांडपिळे, नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, एकनाथ गायकवाड, अ‍ॅड. मनोज भुजबळ, डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, नितीन पाटील, नगरसेविका वृषाली वाघमारे, सुशीला घरत, सीताताई पाटील, दर्शना भोईर, राजेश्री वावेकर, अरुणा भगत, शिवसेना महानगर प्रमुख रामदास शेवाळे, भाजप नेते संदीप पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, भाजप नेते जगदीश घरत, युवा नेते हॅप्पी सिंग, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भाजप नेते सुधाकर पाटील, रमेश तुपे, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, महिला मोर्चाच्या आशा भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply