नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
कोरोना अर्थात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सुरू असलेल्या देशव्यापी टाळे बंदीच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) प्रकल्पातील नगर रचना परियोजना-6 (टीपीएस-6) करीता एप्रिल, 2020 मध्ये नियोजित असलेली जमीन मालकांची सभा ही डिजिटल माध्यमातून पार पाडण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे.
या अंतर्गत परियोजनेचे सर्व तपशील सिडकोच्या संकेतस्थळावर व व्हॉटसअॅपच्या माध्यमातून जमीन मालकांकरिता उपलब्ध असणार आहेत. नगर रचना परियोजना-6 तयार करण्याचा इरादा 8 ऑगस्ट 2019 रोजी जाहीर करण्यात आला असल्यामुळे त्यासंबंधीची जमीन मालकांची सभा माहे एप्रिल 2020 पर्यंत घेणे बंधनकारक आहे. मात्र कोविड-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 25 मार्चपासून देशव्यापी टाळेबंदी लागू आहे. अशा परिस्थितीत सिडको आपल्या अभ्यागतांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या जमीन मालकांची सभा प्रत्यक्षरित्या घेऊ शकत नाही. मात्र जमीन मालकांच्या सुविधेसाठी सिडकोतर्फे या परियोजनेचे सर्व तपशील संकेतस्थळ व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. टीपीएस-6 विषयीचे सर्व नकाशे व भूखंडांची माहिती 24 एप्रिल ते 4 मे दरम्यान जमीन मालकांना सिडकोच्या हीींिीं://लळवले.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप/परळपर या संकेतस्थळावर घरबसल्या पाहता येईल.