Breaking News

खोपोलीमध्ये मुक्या प्राण्यांची सेवा

खोपोली ः प्रतिनिधी

खोपोली शहर परिसर, बोरघाट परिसरात मुक्या प्राण्यांसाठी अन्नपाणी आणि चारा पुरविण्यासाठी प्राणीमित्र दर्शन शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुप सक्रिय झाला आहे. या ग्रुपचे सदस्य व नगरसेवक  किशोर पानसरे, सदस्य धर्मेंद्र रावळ, गुरुनाथ साठेलकर, मनोहर म्हात्रे, अमोल कदम, प्रवीण क्षीरसागर, हनिफ कर्जीकर, बाबू पुजारी, विजय भोसले, दिनेश ओसवाल, दिलीप देशमुख, अमोल ठकेकर, प्रफुल्ल मुंढे, दिनेश मोरे, आकाश सताणे, अमित पवार, भक्ती साठेलकर, प्रवीण शेंदरे, आशिष दळवी, सौरभ शिगवण, रवी पाटील आदी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. खोपोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेटे व अधिकारी वैभव ओव्हाळ या उपक्रमात प्रशासकीय बाजूने सहकार्य करणार आहेत. या उपक्रमासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून कार्यकर्त्यांकडून स्वतः सहभागी होऊन विशेष निधी खर्च केला जात आहे. खोपोलीतील सहज सेवा फाऊंडेशनकडून यापूर्वीच शहरातील मोकाट आणि पाळीव प्राण्यांसाठी अन्नपुरवठा केला जात आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply