Breaking News

जासई परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित

अलिबाग : प्रतिनिधी

जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई हद्दीतील बिल्डींग इ व एफ रेल्वे कॉलनी, जासई गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे क्षेत्र कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास रायगड जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असे चौधरी यांनी कळविले आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply