Breaking News

पाली देवद ग्रामपंचायतीत फुलणार कमळ; योगेश पाटील भाजपच्या प्रचारात सक्रिय

पनवेल : प्रतिनिधी

पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायत हद्दीतील भाजपचे कार्यकर्ते योगेश पाटील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या प्रचारात सक्रिय झाल्याने ग्रामपंचायतीत कमळ फुलणार हे निश्चित झाले आहे. पाली देवद ग्रामपंचायतीच्या उमेदवार डॉ. दीप्ती योगेश पाटील आणि भारती भीमराव मोरे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास दाखवून प्रभाग दोनमधील भाजप उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर करून आपल्या परिवारसह त्यांच्या प्रचारास सुरुवात केली आहे. पाली देवद ग्रामपंचायत हद्दीतील भाजपचे कार्यकर्ते योगेश पाटील यांनी या वेळी बोलताना सांगितले की, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निर्देशानुसार माझ्या पत्नीने दोन प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु अर्ज मागे घ्यायच्या वेळी काही गैरसमज आणि अडचणीमुळे अर्ज मागे घेता आला नाही. आमदारसाहेब आज स्वत: सुकापूरमध्ये लक्ष देऊन विकासासाठी प्रयत्न करीत आहेत, पण आता या अडचणी दूर झाल्या असल्याने मी स्वत: प्रचारात जिथे जिथे माझी गरज लागेल तिथे जाणार आहे. ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रभाग क्रमांक 2 ‘अ’मधील उमेदवार माझी पत्नी डॉ. दीप्ती योगेश पाटील यांनी भाजपचे प्रभाग 2 ‘अ’मधील उमेदवार दिवेश दत्तात्रय भगत यांना पाठिंबा जाहीर केला आहे आणि प्रभाग क्रमांक 2 ‘ब’ मधील उमेदवार भारती भीमराव मोरे यांनी प्रभाग क्रमांक 2 ‘ब’मधील भाजप उमेदवार पूनम प्रमोद भगत यांना आपला पाठिंबा जाहीर करून आपल्या परिवारासह त्यांना निवडून आणण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली असल्याची माहिती योगेश पाटील यांनी दिली. योगेश पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केल्याने शेकापच्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते सांगतील त्याप्रमाणे पक्षाचे कार्य करणार आहे. माझा पाठिंबा भाजपच्या उमेदवारांना असणार आहे. मी प्रभाग 1मधून निवडून आल्यावर माझ्या शिक्षणाचा गावाच्या विकासाला कसा फायदा करून देता येईल याचा प्रयत्न आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे.

-डॉ. दीप्ती योगेश पाटील, उमेदवार, भाजप

आमदार प्रशांतदादांवर माझा पूर्ण विश्वास आहे. काही अडचणीमुळे मी शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेऊ शकले नाही, पण माझा भाजप उमेदवार पूनम प्रमोद भगत यांना पूर्ण पाठिंबा आहे.

-भारती भीमराव मोरे, कार्यकर्त्या, भाजप

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply