Breaking News

17 हजार फूट उंचीवर अनोखी होळी साजरी

भारतीय जवानांचा उत्साह

लडाख ः वृत्तसंस्था
संपूर्ण देशभरात होळी आणि धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. लडाखच्या गलवानमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी तब्बल 17 हजार फूट उंचीवर होळी साजरी केली. हटके अंदाजातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये आयटीबीपीचे जवान हरियाणवी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या वेळी त्यांच्या चेहर्‍यावर होळीचा आनंद आणि उत्साह पुरेपूर दिसून येतो. विशेष म्हणजे देशाची सेवा करणारे जवान प्रत्येक सण-उत्सवदेखील शक्य होईल त्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतात हे दिसून आले.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply