Breaking News

जलाशय कोरडे पडण्याच्या मार्गावर

मोहोपाडा : प्रतिनिधी

उन्हाळ्याची चाहूल लागताच बहुतेक पाण्याचे स्त्रोत जवळ जवळ तळ गाठण्याच्या मार्गावर असताना पाण्यांचे संकट अधिक गडद होत चालले असताना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर निर्माण होत असल्याची चाहूल नागरिकांना जाणवू लागली आहे. मात्र काही ठिकाणी डोंगरांच्या जवळ असलेले तुरळक झर्‍याच्या माध्यमातून निर्माण होणारे पाणी याच पाण्यावरती काही आदिवासी समाज हेच पाणी पिवून आपली तृष्णा शांत करीत असतात. मात्र ग्रामीण भागात पाण्यासाठी विहीर, तलाव, कूपनलिका असते मात्र रणरणत्या उन्हामुळे या स्त्रोतांची पाण्याची घट झाली आहे. यामुळे अनेकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र अजुनही पाऊस पडण्यास दीड महिन्याचा कालावधी असताना या पाणीटंचाईच्या झळा सर्वांना सहन कराव्या लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांना रणरणत्या उन्हातही पाण्यासाठी धडपडावे लागत आहे. तसेच पाणीटंचाईने उग्ररुप धारण केल्यामुळे याच्या झळा विद्यार्थ्यांसह महिलावर्गांसही बसत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply