Breaking News

कलाकारांना मदतीचा हात

पनवेल ः वार्ताहर

संपूर्ण विश्व कोरोना (कोविड-19) नावाच्या आजाराशी झुंज देत असताना पनवेल तालुक्यात संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून  पनवेल व रायगडमधील कलाकारांना धान्य आणि आर्थिक मदत करण्यात आली. मार्च, एप्रिल, मे महिन्यांत कलाकारांचा विशेष सीझन असतो. त्यामध्ये कलाकार जे काही कमवतो त्यावर नोव्हेंबरपर्यंत आपले घर चालवतो. बँक ईएमआय,  मुलांची फी भरतो, पण याच सीझनच्या तीन महिन्यांत घरी बसल्याने बर्‍याच कलाकारांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. त्या अनुषंगाने संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 150 कलाकारांना धान्य व आर्थिक मदत देण्यात आली. जास्तीत जास्त कलाकारांपर्यंत ही मदत पोहचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मुकेश उपाध्ये यांनी दिली आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply