आज देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या चेर्यावर पाकिस्तानबद्दल इतका संताप निर्माण झालं की आज प्रत्येक तरुणाचं रक्त पाकविरोधी सळसळत सुटलं आहे, मात्र हा निर्लज्ज दहशतवाद पोसणारा पाक शेवटी स्वतःची लायकी दाखवली. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना अगदी तसलेच प्रकारे या पाकच्या गुणधर्मात दिसून येत आहे.
पुलवामाच्या हल्ल्यानंतर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाच्या दुःखात अख्खा देश सहभागी झाला असता, जवानांनी सांडलेल्या रक्ताची भरपाई आपल्या भारतीय जवानांनी करून दाखवली, भारत-पाकच्या इतिहासात आजवर झालेल्या प्रत्येक वेळी भारताने प्रत्युत्तर दिलेलं आहे. तसेच प्रत्युत्तर परवा पाकच्या हद्दीत घुसून भारतीय हवाई दलांनी ‘जैश-ए मोहम्मद’ या पाकड्या दहशतवाद्यांच्या तळावर निशाणा साधून त्या कर्मठ पापीस्थानच्या दहशतवाद्यांना कंठस्नानी धाडले, त्यात आपला कमांडर वर्धमान अभिनंदन पाकच्या ताब्यात सापडला असता, आंतराष्ट्रीय जिनेव्हा करारानुसार कायद्याचे उल्लंघन न करता पाकने आपल्या जवानाला भारताकडे सोपवण्याची जबाबदारी उठवली, जागतिक दबाव आणि मुत्सद्देगिरीच्या बळावर अभिनंदनला भारताने सोडायला भाग पाडले आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या सुटकेची घोषणा केली, पण पडद्यामागे मोठं नाट्य घडत होतं. पापिस्थान आपल्या गुणधर्मानुसार आपली जीभ बाहेर काढत सुटलं, कुपवाडा येथे शस्त्रसंधीचा उल्लंघन करून पाकड्यांकडून आज भारतीय जवानांवर गोळीबार करण्यात आला. त्यात भारतीय पाच जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे, काही जखमी देखील झाले आहेत. भरतानेही यास प्रत्युत्तर दिले, गेल्या दोन दिवसांत पाकने 36 पेक्षा जास्त वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. हे वाढत चाललेला पाक कढून वेळोवेळी गोळीबार करणे व पाकने पोसलेल्या दहशतवाद्यांकडून हल्ला घडवून आणणे हे काही थांबण्याचा नाव घेत नाही. 1947 पासून सुरुवात झालेल्या भारत पाकच्या युद्धाला आजही तेच वळण दिले जात आहे. भारत आज युद्ध करण्यास पाक ला प्रत्युत्तर देण्यास सर्व अंगाने तयार आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतो, ‘युद्धाने कुठल्याच प्रश्नाचं निरसन होत नाही, आपण चर्चेने प्रश्न सोडवू, काश्मीर असो व आमच्या भागातील दहशतवादी संघटना त्यास बंदी लादणे वैगेरे…’ पाक स्वतःला हितवादी समजतो अन दहशतवादी असल्याचे विसरतो, झालेल्या हल्ल्यात आमचा हात नसल्याचे सांगतो. हा पाक म्हणजे पेठ देऊन बाजूला उभारणार देश, खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असलेल्या या पाकच्या वर्तुणुकीला आज सारा देश खवताळून उठतोय. खरंय युद्धाने कुठलेच प्रश्न सुटत नाहीत, युद्ध ही कोणत्याही देशाला परवडणारी गोष्ट नव्हे. पहिल्या आणि दुसर्या महायुद्धाचे उदाहरणे आहेत आपल्या समोर, पराभूत झालेल्या राष्ट्राची राखरांगोळी झाली असली तरी विजयी राष्ट्र देखील बरबाद झाले आहेत. म्हणून युद्ध हे कुठल्याही गोष्टीचे उत्तर नाही, मात्र या देशाला पाकिस्तानच्या कुरापती व दहशतवादाचा बंदोबस्त करण्यासाठी कठोरात कठोर पावले उचललीच पाहिजे. त्यासाठी संपूर्ण देश लष्करांच्या आणि सरकारच्या पाठीशी आहे, पण आपल्या सैनिकांचे जीवितही तितकेच महत्त्वाचे आहे. देशाचं संरक्षण हे पहिले सैनिकांचा जे सर्वोत्तम कर्तव्य असलं पाहिजे.
कुठलाही वाद हा प्रथम चर्चेने सुटतात, पाकिस्तान आज चर्चेसाठी भारतापुढे लोटांगण घालत शरणागत पत्कारले तरी तो चर्चेस पात्र नाही हे मागील इतिहासातून दिसून येते, 1999 ला बसने लाहोरला जात वाजपेयींनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर विस्तृत चर्चा केली होती. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात देखील चर्चेतून प्रश्न सोडवण्यास प्रस्थापित पाक व्यवस्थेशी चर्चा करण्यात आली. मात्र कुठल्याच प्रकारचे बदल या पाकमध्ये दिसला नाही. यावर कायमचा तोडगा आवश्यक आहे.
-श्रीपाद नागनाथ राऊतवाड