Breaking News

राज्यातील सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन

प्रथम क्रमांकास एक लाख रुपये तर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास 40 हजारांचे बक्षीस

पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षिणक, सामाजिक, कला. क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 23वी राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी, यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने गेल्या 22 वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून यंदा ही 23वी स्पर्धा आहे.
भरघोस रकमेची पारितोषिक असलेल्या या स्पर्धेच्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमाकांस एक लाख रुपये, द्वितीय क्रमाकांस 50 हजार तर ततीय क्रमाकांस 30 हजार रूपये तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील उत्कष्ट कथेसाठी सात हजार रूपये, उत्कष्ट कविता, उत्कष्ट व्यंगचित्र, उत्कृष्ट विशेषांक व उत्कृष्ठ मुखपृष्ठ यांना प्रत्येकी पाच हजार रुपये, त्याचबरोबर बालसाहित्याच्या सवोत्कष्ट अंकास 7500 रुपये तसेच रायगड जिल्ह्यातून प्रकाशित होणार्‍या दिवाळी अंकांसाठी खास पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये प्रथम क्रमांकास 40 हजार रूपये, व्दितीय क्रमांकास 20 हजार रूपये आणि तृतीय क्रमाकांस 10 हजार रुपये, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी पाच हजार रुपये आणि सर्व पुरस्कारप्राप्त अंकांना सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठया संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाभळे, संयोजक दीपक म्हात्रे यांनी केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिवाळी अंकाच्या दोन प्रती 100 रूपये प्रवेश फीसह 20 डिसेंबरपर्यंत पाठवाव्यात. दिवाळी अंक पाठविण्यासाठी व अधिक माहितीसाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, प्लॉट क्रमांक 475, मार्केट यार्ड, पनवेल, जि. रायगड, अनिल कोळी (9769409161) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply