कळंबोली : प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारीत गेली दीड महिन्यापासून डॉक्टर, नर्स, पोलिस कर्मचारी कोरोना विषाणूशी दोन हात करून नागरिकांचे जीव वाचवत आहेत. त्यांच्या बरोबरीने त्यांच्या खाद्याला खांदा लावून आपला जीव धोक्यात घालून पनवेल महानगरपालिकेचे सफाई कामगार आपले कर्तव्य बजावत आहेत. हा कामगार दिर्लक्षित राहीला आहे या कामगारांवर आज कामगार दिनाचे औचित्य साधून खांदा कॉलनीमध्ये नागरिकांकडून पुष्पवृष्टी करून सन्मान करण्यात आला.
कोविड 19 या रोगराई विरोधात पनवेल महानगरपालिकेचे सफाई कामगार जीवाची बाजी लावून जनतेची सेवा करत आहेत असा कामगारांकडे समाजाकडून दखल घेतली जात नाही. या पनवेल महानगरपालिकेच्या सफाई कामगारांचा 1 मे या कामगार दिनी सेक्टर 5 खांदा कालनी येथील जनतेने या सफाई कर्मचारी यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांच्या सेवेला दाद दिली. या वेळी जेष्ठ साहित्यिक रामदास गायधने, सेक्टर 5 चे अध्यक्ष मंगेश गायकर, किर्ती मांडविकर, सुधिर शिंदे, विश्वास रेडेकर, संतोष बोबडे, जयप्रकाश गोसावी, रामजी निगुडकर, वसंत गुरव, अतुल गायधने, राहुल मोहिते, रामदास औटी, शशिकांत साळवे सि. आर. मोरे व संजय परब आदी मान्यवर उपस्थित होते.