Breaking News

विसपुते कॉलेजमध्ये ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्र आणि कामगार दिन

पनवेल : प्रतिनिधी

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन नवीन पनवेल मधील  आदर्श शैक्षणिक समूहाच्या श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते बी.एड्. महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (मुंबई विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 1) 87 डीएसएमच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ऑनलाइन साजरा करण्यात येऊन आदर्श शैक्षणिक समूहाच्या बी.एड्. महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला.  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे, यामुळे गेले अनेक दिवस घरात राहिल्याने नकारात्मकतेमध्ये वाढ झाली आहे, सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी ध्यानात घेऊन या संकटातून बाहेर पडण्यासाठी व सकारात्मक दृष्टिकोन आणि कोरोना संदर्भात जाणीवजागृती करण्यासाठी आदर्श शैक्षणिक समूहाच्या श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते बी.एड्. महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (मुंबई विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी 87 डीएसएमच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चेअरमन धनराजजी विसपूुते, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू डॉ. वायुनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, डॉ. सुभाष सोनुने, डॉ. वामन नाकले, डॉ. नरेंद्र जोशी, डॉ. टी. के. सोनवणे, रागिणी पाटील, जान्हवी खरमासे, हेमंत जगताप (कार्यकारी अभियंता) ऑनलाइन उपस्थित होते. ’महाराष्ट्राला मानाचा मुजरा’ ही चित्रफीत दाखवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करत कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. डॉ. वामन नाकले यांनी सर्वांना कोरोना विरुद्ध कसे लढावे या संदर्भात मार्गदर्शन केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वायुनंदन सर यांनी कोरोनाच्या संकटातून कसे बाहेर पडता येईल व या समस्येतून संधी कशा मिळतील हे सांगत सर्वांना नवी दिशा व सकारात्मक दृष्टी दिली. यानंतर जाणीवजागृतीसाठीच्या ऑनलाइन क्विझचे उदघाटन धनराजजी विसपुते व डॉ. वायुनंदन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. धनराजजी विसपुते यांनी सद्यपरिस्थिती आणि आपली भूमिका यावर भाष्य करत ’समस्येतून संधी निर्माण होतात’ याची माहिती दिली. या आगळ्यावेगळ्या ऑनलाइन कार्यक्रमामुळे आदर्श शैक्षणिक समूहाच्या बी.एड्. महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply