Breaking News

ज्यबिलिएंट फार्मा केमिकल लॅबकडून पनवेल महानगरपालिकेसाठी मदत

निवारागृहासाठी तीन टन तांदूळ, मसाल्याचे पदार्थ

पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार

ज्यबिलिएंट फार्मा केमिकल लॅबने निवारागृहासाठी तीन टन तांदूळ व मसाल्याची मदत केली आहे. ज्यबिलिएंट फार्मा लॅबने यापूर्वी पनवेल महानगरपालिकेस एक टन सोडीयम हायपोक्लोराईड देऊन सामाजिक दायीत्व दर्शविले होते. रविवारी (दि. 3) पुन्हा या खाजगी लॅबने पुढाकार घेऊन पनवेल महानगरपालिका संचलित निराधार गृहातील लोकांना जेवणाची सोय व्हावी यासाठी तीन टन उत्तम दर्जाचा तांदूळ दिला. सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या देशामध्ये शासनाचे अनेक प्रयत्न सुरु आहेत. यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. देशात सर्व व्यवहार ठप्प आहेत. या लॉकडाऊनच्या काळामध्ये हातावर पोट असणारे मजूर, गरीब नागरिक, झोपडपट्टीवासीय, रोजंदारीवर आपला उदरनिर्वाह करणारे नागरिक यांच्यावर उपासमारीचे संकट आले आहे. अशावेळेस त्यांना मदत करण्याचे शासनाने आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने अनेक सामाजिक संस्था, कंपन्यांनी मदतीचा हात पुढे करुन अशा गरजूंसाठी जीवनावश्यक वस्तू, अन्नदान केले जात असल्याचे पहावयास मिळत आहे.  त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संकटामुळे बेघर, निराधार मजूर, विस्थापित कामगार आणि गरजू नागरिकांसाठी पनवेल महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रात चार निवारा केंद्रे उभारली आहेत. त्यामध्ये 99 जणांना आश्रय दिला आहे. अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्ते कोणतीही प्रसिद्धी न करता कोरोनासारख्या आंतरराष्ट्रीय आपत्तीत पुढाकार घेऊन त्यासाठी महापौर निधीला आर्थिक मदत करीत आहेत. ज्यबिलिएंट फार्मा लॅबच्या संचालिका डॉ. माधुरी देशमुख यांनी निराधार गृहातील लोकांना जेवणाची सोय व्हावी यासाठी तीन टन उत्तम दर्जाचा दिलेला तांदूळ योगेश रानडे यांनी निराधार गृहात पोहचवला. डॉ. माधुरी देशमुख या अनेक सामाजिक कार्याबरोबरच जलसंधारणासाठी देखील काम करीत असतात.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply