Breaking News

पमपा अधिकारी-कर्मचार्यांसाठी इन्फ्राईड थर्मोमिटर मशिन

पनवेल : वार्ताहर

आजच्या घडीला कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था अस्थिर झाली आहे. भविष्याचा वेध घेणे कठीण बनले असून या सर्व परिस्थितीची जाण ठेवून अपंश्री ऑटोमेशन प्रा. लि. च्या वतीने पनवेल महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी इन्फ्राईड थर्मोमिटरचे पाच-पाच मशिन महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. आपले प्रशासन दिवसरात्र झटत आहे. तसेच पनवेल महानगरपालिकचेे आयुक्त तसेच त्यांचे कर्मचारी वर्ग देखील कोरोेना महामारीवर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा करीत आहेत. या कामाचे कौतुक करतानाच त्यांच्या या कामामध्ये खारीचा वाटा म्हणून पनवेल स्थित अपंश्री ऑटोमेशन प्रा. लि.च्या वतीने पनवेल महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी इन्फ्राईड थर्मोमिटरचे पाच-पाच मशिन महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply