Breaking News

व्हिटॅमिन सी मिळवा आणि तंदुरुस्त राहा!

आहारात आपण वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करीत असतो. सध्या कोरोना व्हायरसचा प्रसार वाढत असल्याने आपण घरच्या घरी चांगला आहार घेऊन रोगप्रतिकारकशक्ती चांगली बनवू शकतो. शरिराला पोषण मिळण्यासाठी आणि आजारांशी लढण्यासाठी व्हिटॅमिन्सची गरज असते. आम्ही तुम्हाला व्हिटॅमिन ‘सी’चे फायदे आणि व्हिटॅमीन सी कशातून मिळते याबाबत माहिती देणार आहोत.

कोरोनाचा ताण आणि वैयक्तीक आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली असेल, तर अशा लोकांसाठी व्हिटॅमिन सी फायदेशीर ठरू शकते. जे लोक जास्त मद्यपान, धूम्रपान करतात तसेच ज्यांना लठ्ठपणा बळावला आहे त्यांच्यामध्येही व्हिटॅमिन सीची कमतरता असू शकते. चांगला आहार घेतल्यास ही कमतरता भरून काढता येऊ शकते.

सध्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. साधा ताप आला तरी कोरोनामुळे लोक घाबरतात. फ्लूसारख्या लक्षणांपासून आराम देण्यात व्हिटॅमिन सी मदत करू शकते जेणेकरून ते इतर गंभीर आजारांचे रूप घेणार नाही. आहारात मध, राजगीरा अशा पदार्थांचा आहारात करून तुम्ही व्हिटॅमिन सी मिळवू शकता.

उन्हाळ्यात उष्णतेमुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. त्वचा तेलकट होणे, पिंपल्स येणे यांसह त्वचाविकारांचा सामना करावा लागतो. शरीरात व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात असल्यास त्वचेच्या समस्या बळावत नाहीत. त्वचेवर नैसर्गिक कोमलता कायम राहते. व्हिटॅमिन सीमुळे सूज, स्नायूचे होणारे नुकसान कमी होते. आंबट फळे व्हिटॅमिन सीचा प्रमुख स्रोत आहेत. याशिवाय ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, आंबा, पपई, फ्लॉवर, कोबी यातूनही व्हिटॅमिन सी मिळते. त्यामुळे यांचा आहारात समावेश करा.

अशा प्रकारे घरच्या घरी काही गोष्टींचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्यातून व्हिटॅमिन सी मिळू शकते आणि ते शरिरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते, जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त राहाल. तेव्हा आताच्या मोकळ्या वेळेत हे करून पहावयास हरकत नाही.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply