Breaking News

राज्यात 11 जूनला मान्सूनची एण्ट्री; ‘स्कायमेट’चा अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

वैशाख महिन्याच्या मध्यावर मान्सूनचे अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. स्कायमेट संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भारतात केरळमध्ये 1 जूनला आणि 11 जूनला महाराष्ट्रात मुंबई, कोकणात मान्सूनचे आगमन

होणार आहे.

स्कायमेट संस्थेने पावसाळ्याचे वेळापत्रकच दिले आहे. त्यात संपूर्ण चार महिने पाऊस राहील, तर 8 ऑक्टोबर ही परतीच्या पावसाची मुदत असेल, असे म्हटले आहे.

अवघ्या एका महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला असून, यंदा 100 टक्के पाऊस असेल, असे भाकीत यापूर्वी विविध संस्थांनी केले आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाला आणि लोकांनाही पावसाळ्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. दरम्यान, गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पारा चढला आहे.विदर्भात तर उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. त्यामुळे विदर्भासह काही विभागांत पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply