Saturday , June 3 2023
Breaking News

कबड्डी स्पर्धेत रायवाडी संघ विजेता

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे टाकादेवी स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 49वी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पांडवादेवी क्रीडा मंडळ रायवाडीने विजेतेपद पटकाविले. जय हनुमान संघ वायशेत उपविजेता ठरला. काळंबादेवी स्पोर्ट्स गडबला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 64 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन उद्योजिका मधू कपूर यांच्या हस्ते झाले. डॉ. दिनमित्र माने, मंडळाचे अध्यक्ष केशव पाटील, उपाध्यक्ष अशोक घरत, मंडळाचे पदाधिकारी व ज्येष्ठ खेळाडू गजानन पाटील, सुनील म्हात्रे उपस्थित होते.

स्पर्धेत मालिकावीर केदार लाल (रायवाडी), उत्कृष्ट चढाई वेळे संघाच्या व उत्कृष्ट पकड वायशेत संघाच्या खेळाडूंनी करून किताब प्राप्त केला. विजेते संघ, उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply