Breaking News

ठाकूर कुटुंबीयांकडून गोरगरीबांना मदतीचा ओघ सुरूच

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 3 मधील गोरगरीब कुटुंबांना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि माजी खासदार दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या विद्यमाने जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो ठाकूर कुटुंबीय समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीला धावून जात असतात. हे फक्त पनवेल, रायगडच नाही तर राज्याने पाहिले आहे. त्यामुळे ठाकूर कुटुंबीय सर्व समाजाचा आधार म्हणून परिचित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने तसेच भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, युवा नेते विनोद घरत, वासुदेव घरत, निर्दोष केणी, ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान गायकर, जगदीश घरत, जयवंत घरत, प्रभाकर जोशी, अल्पसंख्याक समाजाचे नेते मन्सूर पटेल, साजिद पटेल, सचिन वास्कर, जयदास तेलवणे, अब्दुल्ला पटेल, संतोष रेवणे, रामचंद्र जाधव, कृष्णा केसरकर, प्रमोद म्हात्रे यांच्या प्रयत्नाने पापडीचा पाडा येथे 200 कुटुंबांना, फरशीपाडा येथे 100, कुटुंबांना, ओवेपेठ 150, खुटुक बांधण गाव व आदिवासी वाडी येथे 150, धामोळे 100, ओवे कॅम्प 150, ओवे 130 अशा जवळपास एक हजार कुटुंबांना अन्नधान्य देण्यात आले.
कोरोनामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत हजारो जणांना एका वेळेच्या जेवणासाठी धडपडणार्‍या जीवांना लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून आधार दिला. लॉकडाऊन घोषित झाल्यापासून जवळजवळ 30 हजार कुटुंबांना रेशन आणि 23 एप्रिलपासून ते आजपर्यंत दरदिवशी पनवेलमध्ये 650, कामोठ्यात 600, कळंबोली 600, खारघरमध्ये 850 गरीब, गरजू व मोलमजुरी करणार्‍या नागरिकांना असे एकूण 50 हजारपेक्षा जास्त लोकांना एक वेळचे जेवण श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, नगरसेवक, कार्यकर्ते, व नागरिकांच्या सहकार्याने देण्यात आले. त्यामुळे खर्‍या अर्थाने ठाकूर कुटुंबीय सर्वसामान्य जनतेची सेवा अखंडपणे करीत आहेत, असे मत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांनी व्यक्त केले आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply