पनवेल : रामप्रहर वृत्त
कामोठे विभागातील कोविड 19 रूग्णांच्या वाढी संदर्भात चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी एका निवेदनाद्वारे कामोठे सेक्टर 8 येथील नागरी प्राथमि आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांकडे केली आहे.
डॉ. भगत यांनी निवेदनात म्हटले आहे की, मागील तीन ते चार दिवसांत कामोठे विभागात कोविड 19 रुग्णांच्या संख्येत वाढ वाढ झालेली दिसून येत आहे, परंतु मला याबाबत शंका निर्माण होत आहे. मी स्वत: आयसीएमआरच्या लिस्टनुसार मागील तीन ते चार दिवसांत जास्त रुग्ण असलेल्या ठिकाणी उदा. भाजी मार्केट सेक्टर 21, भाजी मार्केट सेक्टर 11 तसेच अंबर रेस्टॉरंट या ठिकाणी जाऊन भेट दिली असता त्या लिस्टमधुन असलेल्या नावाची व्यक्ती आढळुन आलेली नाही. तसेच तेथे चौकशी करताना महापालिकेतून सॅम्पल घेण्यासाठी कोणीही आलेले नव्हते असे सांगण्यात आले. तसेच लिस्टमधील बहुतेक रुग्णांचे दिलेले मोबाइल क्रमांक व पत्तेसुध्दा चुकीचे आहेत. तरी याबाबत नक्की रुग्णांचे सॅम्पल घेतले आहेत किंवा नाहीत याबाबत योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी ही विनंती.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper