पेण : प्रतिनिधी
व्यापारी, भाजी विक्रेते, दुकानदारांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत आपला व्यवसाय करावा अशी सूचना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पेण बाजारपेठेतील व्यापारी वर्गाला दिल्या. पेण शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये या करीत गुरुवारी पेणमधील मुख्य बाजारपेठेत नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत उपनगराध्यक्षा वैशाली कडू, सभापतीदर्शन बाफणा, मुख्याधिकारी अर्चना दिवे, अभिराज कडु तसेच नगरपरिषद कर्मचारी
उपस्थित होते. या वेळी दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, ग्राहकांनी रांगेत उभे राहावे, गर्दी करू नये, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच दिलेल्या वेळेत आपली दुकाने चालू व बंद करावीत अशा सुचना नगराध्यक्षांनी दिल्या. पेण तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला असुन यामुळे शहरातील नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. कुटुंबातील वृद्ध व्यक्ती व लहान बालकांची विशेष काळजी घेतली पाहिजे, विनाकारण बाजारात किंवा आपल्या परिसरात फिरणे टाळावे.
आजकाल प्रत्येकाकडे मोबाइल असल्यामुळे केंद्रशासनाने सादर केलेल्या सेतू अॅप प्रत्येकाने आपल्या मोबाइलमध्ये लोड करून घ्यावा आहे हे आपल्या व दुसर्याच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह ठरणार असल्याचे या वेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी सांगितले.