पनवेल : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 30) कोरोनाच्या 42 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 33 रुग्ण पनवेल तालुक्यातील आहेत. याशिवाय अलिबाग चार, माणगाव दोन, तर उरण, खालापूर व रोहा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
पनवेल तालुक्यात महापालिका हद्दीत 23 आणि ग्रामीण भागात 10 रुग्ण आढळले आहेत, तर 31 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात आजपर्यंत कोरोनाचे 689 रुग्ण झाले असून, 427 जणांनी कोरोनाला हरविले, तर 31 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात शनिवारी एकट्या कामोठ्यात आठ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे कामोठ्यातील रुग्णांची संख्या 189 झाली आहे. यामध्ये सेक्टर 20मधील पुष्पदीप सोसायटीतील एकाच कुटुंबातील चौघांचा सेक्टर 9 येथील संग्राम अपार्टमेंटमधील एकाच कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. सेक्टर 7 आणि 9मध्ये प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. कळंबोलीमध्ये आठ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 84 झाली आहे. सेक्टर 13मधील श्रद्धा सोसायटीतील एकाच कुटुंबातील चौघांना लागण झाली आहे. सेक्टर 16, 3, 36 आणि रोडपालीत प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
खारघरमध्ये चार नवीन रुग्ण नोंदल्याने एकूण 108 रुग्ण झाले आहेत. त्यात ओवेपेठ येथील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. सेक्टर 15 घरकुलमधील प्रियदर्शनी सोसायटीतील एक व्यक्ती 29 मे रोजी पूर्ण बरी झाल्यावर हॉस्पिटलकडून रिपोर्ट मिळाला आहे. पनवेल शहरात तीन नवे रुग्ण आढळले असून, त्यामुळे पनवेलमधील रुग्णांची संख्या 33 झाली आहे. शहरातील पंचरत्न हॉटेल नाका प्रियदर्शन सोसायटीत एक, तर तक्का येथील प्रजापती कॉम्प्लेक्समध्ये एकाच कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात आजपर्यंत 2777 टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी 496 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. 85 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. 303 रुग्ण बरे झाले. 171 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये शनिवारी 10 नवीन रुग्ण आढळले असून, 10 जणांनी कोरोनावर मात केली आहे. उसर्ली खुर्दमध्ये पाच रुग्णांची भर पडली असून, त्यात ओम साई घरकुलमधील दोन महिलांचा समावेश आहे. अन्य रुग्णांत 3, 8 आणि 12 वर्षांची लहान मुले आहेत. याशिवाय चिपळे, विचुंबे, वावेघर, कुंडेवहाळ आणि पोयंजे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. ग्रामीण भागात 449 टेस्ट घेण्यात आल्या असून, 27 टेस्टचे रिपोर्ट बाकी आहेत. आतापर्यंत 193 रुग्ण आढळले. त्यापैकी 124 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 60 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.