Breaking News

भाजपची कामे जनतेपर्यंत पोहोचवा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त

आमदार प्रशांत ठाकूर यांना मोठ्या मताधिक्क्याने तिसर्‍यांदा विधानसभेत पाठविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे आणि केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पक्षाने केलेली विकासकामे त्यांच्यापर्यंत पोहोचवावीत, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते भाजपच्या बैठकीत बोलत होते.

पुन्हा आणू या आपले सरकार, या शीर्षकाखाली पनवेल तालुका मंडलतर्फे कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी (दि. 24) विचुंबे तसेच पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक हॉल व चिंतामणी हॉलमध्ये सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. त्या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यकर्ता बैठकांना भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, के. ए. म्हात्रे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, जि. प. सदस्य अमित जाधव, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भूपेंद्र पाटील, नगरसेवक मनोहर म्हात्रे, नितीन पाटील, मुकीद काझी, नगरसेविका मुग्धा लोंढे, हेमलता म्हात्रे, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, नाझ हाफिज, तसेच प्रतिभा भोईर, लीना पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply