संजय भोपी यांचा खांदा कॉलनी येथे उपक्रम
कळंबोली : प्रतिनिधी
संपूर्ण देशभर कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या विषाणू सोबत लढण्याकरिता रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याकरीता पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष संजय भोपी यांच्या कडून माजी खासदार लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 31) रोजी खांदा कॉलनीमध्ये अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीचे गोळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी वाढदिवस आहे. या कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी करण्यात आली आहे. या टाळेबंदी काळात गरीब गरजू, बेघर, निराधाराना या कोणावरही उपासमारीची वेळ येवू नये म्हणून दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने अनेक उपक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे बेघर निराधारांना मोठा दिलासा मिळाला आहे . लोकनेते रामशेठ ठाकूर समाज हिताचे कार्य करत जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा करत आले आहेत. त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलत पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष संजय दिनकर भोपी यांनी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खांदा कॉलनी मधील सर्व नागरिकांना केंद्रीय मंत्रालयाच्या आयुष्य मंत्रालयाने प्रमाणीत केलेल्या अर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक या कोरोना विरोधात रोगप्रतिकारशक्ती वाढविणा-या पाच हजार गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी संजय भोपी प्रतिष्ठांच्या कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेतली.
केंद्र शासनामार्फत केलेल्या सूचनांचे पालन केल्यास हा आजार आटोक्यात आणू शकतो. नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये आपले व आपल्या कुटूंबियांनची काळजी घेत दैनंदिन जीवन जगावे. घरातच रहा व सुरक्षित रहा.
-संजय भोपी, अध्यक्ष, प्रभाग समिती ‘ब’, पमपा
कामोठे येथे आज, उद्या होमिओपॅथिक गोळ्यांचे वितरण
कामोठे : रामप्रहर वृत्त
भाजप कामोठे शहर मंडल अध्यक्ष रविंद्र जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवारी (दि. 1) व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. 2) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकार शक्ती वाढविणार्या अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या गोळ्यांचे वाटप कामोठे प्रभाग क्र. 13 मधील नागरिकांना करण्यात येणार आहे. तसेच या गोळ्यांचे सेवन व घेण्याची मात्रा सकाळी रिकाम्या पोटी सलग 3 दिवस घेणे, वयस्कर नागरिकांनी 4 गोळ्या घेणे व लहान मुलांनी 2 गोळ्या घेणे. अधिक माहितीसाठी अमित रोकडे (9167837007) या क्रमांकावर संपर्क साधावा.