Breaking News

उरण नगरपरिषदेकडून दिव्यांगांना आरोग्य कीटचे वाटप

उरण : वार्ताहर

उरण नगरपरिषदेच्या वतीने गुरुवारी (दि. 28) उरण शहरातील सुमारे 123 दिव्यागांना आरोग्य कीट वाटप करण्यात आले. शासनाच्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेऊन उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः नगराध्यक्षा सायली म्हात्रे, कर्मचारी यांनी दिव्यांग यांच्या घरी जाऊन आरोग्य कीट दिले. कीटमध्ये टॉवेल, फिनेल, साबण, सॅनिटायझर, हॅण्डवॉश, मास्क  आदी वस्तूंचा समावेश होता.

या वेळी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, गटनेता तथा नगरसेवक रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, भाजप उरण शहर महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, आरोग्य सभापती रजनी कोळी, मुख्यधिकारी अवधूत तावडे, नगरसेविका दमयंती म्हात्रे, नगरसेविका जानव्ही पंडीत, नगरसेविका आशा शेलार, नगरसेविका प्रियंका पाटील, नगरसेविका स्नेहल कासारे, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेवक धनंजय कडवे, नगरसेवक नंदकुमार लांबे, नगरसेविका यास्मिन गॅस, नगरसेवक मेराज शेख, नगर अभियंता अनुपकुमार कांबळे, अभियंता झुंबर माने, आरोग्य निरीक्षक महेश लवटे, लेखापाल नाथिराम देसाई व कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.

उरण नगरपरिषदेकडून, प्रत्येक दिव्यागांला उदरनिर्वाहासाठी  वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. त्यांना समाजातील प्रत्येकाने मदतीचा हात दिला पाहिजे, असे नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी सांगितले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply