पनवेल : रामप्रहर वृत्त
जाणीव हा शब्द माझ्या अत्यंत जवळचा आहे. त्यामुळे जाणीव एक सामाजिक संस्था ही समाजिक भान ठेवून आणि आपल्या कर्तव्याप्रती सजग राहून विविध उपक्रम राबवत आहे. त्याबद्दल संस्थेचे तसेच तिच्या सर्व सदस्यांचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुद्धीबळ आणि कॅरम स्पर्धेच्या उद्घाटनावेळी केले.
पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जाणीव एक सामाजिक संस्था आणि सखी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.3) पनवेलमध्ये आमदार चषक भव्य बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शहरातील आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उदघाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. लोकनेत रामशेठ ठाकूर यांनी या वेळी कॅॅरम आणि बुद्धीबळ खेळून खेळाडूंना प्रोत्साहित केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी, जाणीव एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयोजीत करण्यात येणार्या स्पर्धा एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देते. त्यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू तयार व्हावेत असे सांगुन आपल्या वाढदिवसाचे औचित्यसाधून या स्पर्धेचे आयोजन केल्या बद्दल संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांचे आभार मानले.
या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस व स्पर्धाआयोजक नितीन पाटील, दि.बा.पाटील यांचे सुपूत्र अतुल पाटील, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, सुनील बहिरा, प्रभाकर बहिरा, प्रदीप सावंत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुलोचना कल्याणकर, निता माळी, प्रिती जॉर्ज, डॉक्टर सुरेखा मोहोकर, हेमलता म्हात्रे, भाजपचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, उपाध्यक्ष व आयोजक प्रीतम म्हात्रे, केदार भगत, सरचिटणीस अमित ओझे, उमेश इनामदार, लिना पाटील, सपना पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper