Breaking News

रोह्यात मान्सूनची बरसात

रोहे ः प्रतिनिधी

रोह्यात बुधवारी (दि. 3) पावसाने जोरदारपणे बरसायला सुरुवात केली. रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात दमदार पाऊस झाला. हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर मंगळवारपासून पावसाला सुरुवात झाली. रोहा शहरासह ग्रामीण भागात बिगरमोसमी पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

मंगळवारी दुपारी 3 वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली. काही काळ पाऊस जोरात पडल्यानंतर रात्रभर संततधार पाऊस पडला.  बुधवारी सकाळपासूनच पावसाने रिमझीम सुरुवात केली. संपूर्ण वातावरण काळोखमय झाले होते. बुधवारी सकाळी 8 वाजेनंतर रोह्यात पावसाने वेग धरला. रात्री काही काळ वीज खंडित झाली होती, परंतु वीज मंडळाच्या कर्मचार्‍यांनी त्वरित काम करून वीजपुरवठा सुरळीत केला. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रोह्यात मंगळवारी प्रांताधिकारी यशवंत माने यांनी बैठक घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात दंवडी पिटवण्यात येत आहे. खाडीकिनारी असलेल्या नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply