
पनवेल : भाजप युवा मोर्चा कामोठे मंडल अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी वाढदिवसानिमित्त रविवारी भानघर येथील करुणेश्वर वृद्धाश्रमात, चिपळे येथील ब्लेस फाऊंडेशन अनाथाश्रमात तसेच अॅमिन्यूअल अनाथाश्रमात भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ब्लँकेट, फळवाटप केले. या वेळी भाजप कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, युवा नेते हॅप्पी सिंग, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, नवनाथ भोसले, धीरज सिंग, अमित जाधव, अमित सावंत, रोहित घाडगे, अमित झावरे, महेंद्र कांबळे, मयांक कुमार, श्रीकांत पाटील, भूषण पाटील, रवी पाटील, सागर सोनार आदी उपस्थित होते.