Breaking News

नवी मुंबईने ओलांडला चार हजारांचा टप्पा; 63 पॉझिटिव्ह, तर 49 रुग्ण कोरोनामुक्त

नवी मुंबई ः बातमीदार

नवी मुंबईत मंगळवारी 63 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नवी मुंबईत रुग्णांची संख्या चार हजार 61 इतकी झाली आहे. तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 124 झाली आहे. मंगळवारी 49 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन परतल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या दोन हजार 355 झाली आहे. 

सलग तीन दिवस दीडशेची संख्या ओलांडल्यानंतर नवी मुंबईची चिंता वाढली होती. पालिका कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी हरतर्‍हेने प्रयत्न करीत आहे, मात्र सोमवारपासून रुग्णसंख्या घटल्याने नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. तरीही नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. सध्या नवी मुंबईतील पालिका तसेच विविध खासगी रुग्णालयांत एक हजार 582 रुग्ण उपचार घेत आहेत. मंगळवारी बाधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर सहा, नेरूळ आठ, वाशी चार, तुर्भे आठ, कोपरखैरणे 13, घणसोली 11, ऐरोली 10, दिघा तीन अशा रुग्णांचा समावेश आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply