पनवेल : वार्ताहर
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात महावितरणच्या वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्ट्यातील तालुके सर्वाधिक प्रभावित झाले असून वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याच दिवसापासून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत असून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंड्याच्या 200 स्वयंसेवकानी वीजपुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी मदतीचा
हात दिला.
अलिबाग तालुक्यातील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंड्याचे पद्मश्री. डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी हे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबिर तसेच स्वच्छता मोहीम इत्यादी विविध कार्यक्रम या संस्थेमार्फत राबविण्यात येत असतात. मा. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सामाजिक हितासाठी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना केंद्र सरकाराकडून पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहेत.
या चक्रीवादळामुळे महावितरणचे अतोनात नुकसान झाल्याची जाणीव डॉ. आप्पासाहेब यांना असून त्यांनी व सचिनदादा धर्माधिकारी यांनी आवश्यक मदत त्यांच्या श्रीसदस्यांकडून करून देण्याचे महावितरणला कळविले होते. तसे त्यांनी श्रीसदस्यांना आवाहन केले होते. त्यानुसार अलिबाग येथील वीजपुरवठा त्वरित सुरु करण्यासाठी प्रतिष्ठानचे 200 स्वयंसेवक रेवदांडा, चौल, ऊसर, नागाव येथे महावितरणच्या कर्मचार्यांसोबत विद्युत खांब उभे करण्यासाठी दिले आहेत. महावितरणला कुशल मनुष्यबळ म्हणून कंत्राटदाराचे कामगार उपलब्ध करून दिले आहेत. काही ठिकाणी जिथे रात्रीचे काम चालू आहे तिथे त्यांच्यामार्फत जनरेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय, काही ठिकाणी खांब उभे करण्यासाठी सिमेंट, वाळू व खडी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यासाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ महावितरणच्या नाशिक, ठाणे, कल्याण, कोल्हापूर व औरंगाबाद या परिमंडलातून कुशल अभियंते व कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. तसेच प्रतिष्ठानचे स्वयंसेवक व स्थानिक गावकरी वीज यंत्रणा उभारण्यासाठी मोलाची मदत करीत आहेत. प्रधान सचिव, ऊर्जा व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी 15 जून रोजी केलेल्या पाहणी दौर्यात आप्पासाहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
’निसर्ग’चक्रीवादळामुळे महावितरणच्या रायगड जिल्ह्यात वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्ट्यातील तालुके सर्वाधिक प्रभावित झाले असून वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याच दिवसापासून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत असून डॉ. श्री. नानासाहेब प्रतिष्ठान रेवदांडाच्या 200 स्वयंसेवकानीं वीजपुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी मदतीचा हात दिला.