पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 17) कोरोनाचे 59 नवीन रुग्ण आढळले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. तर 21 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 41 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चौघांचा मृत्यू झाला आहे तर 16 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 18 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून पाच रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे आठ, खारघर नऊ, कळंबोली 18, नवीन पनवेल पाच आणि पनवेल मध्ये एक रुग्ण सापडला आहे. तसेच कामोठे सेक्टर 18 यश गार्डन मधील एक 25 वर्षी महिला, तळोजा पानाचंद येथील 69 वर्षीय व्यक्ति, कामोठे सेक्टर 18 जे. जे. समृध्दी सोसायटीतील 72 वर्षीय व्यक्ति आणि कळंबोलीतील 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये मधील रुग्णांत नेवाळी येथील माऊली रेसिडेंसी मधील चार चिपळे येथील दोन महिला, उलवे येथील 8 वर्षीय मुलगा, उसर्ली दोन, नेरे दोन, विचुंबे, पळस्पे, कोप्रोली, देवद, सुकापुर आणि बोनशेतमध्ये प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळला आहे. उलवे तीन विचुंबे आणि नेरे येथील प्रत्येकी एका रुग्णाने कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.