Breaking News

उत्तम आरोग्यासाठी लाल फळे

आरोग्य प्रहर

निरोगी राहण्यासाठी निरोगी दिनक्रमाबरोबरच आहारामध्ये भरपूर पोषक तत्त्वे असलेली लाल फळेसुद्धा गरजेची आहेत. व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्सयुक्त असलेल्या या गोष्टी बर्‍याच आजारांपासून बचाव करतात.

बीट- अँटीऑक्सिडंट, पोटॅशियम, फायबर, फॉलेट आणि व्हिटॅमिन्सने भरपूर बीट आरोग्यासाठीच नव्हे, तर त्वचेसाठीसुद्घा खूप फायदेशीर आहे. यात आढळणारी पोषक तत्त्वे शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतात.

कांदा- कांद्यामध्ये सल्फर, अमिनो अ‍ॅसिड, फायबर्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे कांदा पोटाच्या आजारांपासून वाचवतो. याने इन्सुलिन लेव्हल स्थिर राहते आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामुळे केसांची लांबी वाढते. कांदा अ‍ॅनिमिया आणि अशक्तपणापासून बचाव करण्यास मदत करतो.

स्ट्रॉबेरी- स्ट्रॉबेरीत पोटॅशियम, फायबर्स आणि कार्बोहायड्रेट्ससारखी शरीरासाठी गरजेची पोषक तत्त्वे असतात. हे हृदयरोगापासून वाचवण्यात मदत करतात. याने इम्युन सिस्टीम मजबूत होते आणि सारखे आजारी पडण्यापासून सुटका होते. हे अस्थमा आणि गाठ्यासारख्या रोगावरील उपचारात परिणामकारक आहे.

टोमॅटो- व्हिटॅमिन सी, लायकोपिन आणि पोटॅशियमने भरपूर टोमॅटो कॉलेस्टेरॉल आणि वजन कमी करण्यास साहाय्यक आहे. याचा मधुमेहातही चांगला फायदा होतो. यामुळे दृष्टी वाढवण्याबरोबरच त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका होते. यात असलेल्या कॅल्शियममुळे शरीराची हाडे बळकट होतात.

सफरचंद- सफरचंद खाण्याने कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांपासून बचाव होऊ शकतो. यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होतो. यकृत मजबूत बनते. सफरचंदाच्या सेवनाने शरीरात मूतखडा होण्यापासून बचाव होतो आणि ऊर्जा वाढवण्यातसुद्धा मदत होते.

डाळींब- अँटीऑक्सिडंट्सने भरपूर डाळींब प्रजननक्षमता वाढवण्यास मदत करतात. रोज मूठभर डाळिंबाचे दाणे खाल्ल्याने कर्करोग, तणाव, हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांपासून बचाव होतो. गरोदरपणात महिलांसाठी डाळींब खाणे लाभकारी आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply